जनसामान्यांचा मातृहृदयी समाजप्रिय सच्चा सेवक, लोकाभिमुख नेतृत्व उत्तमराव देशपांडे
एका सच्च्या सेवकाला ही भूमी पोरखी झाली.
भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर नागनाथाच्या पावन पवित्र भूमीमध्ये ज्यांनी दहा वर्ष सरपंच पदाची अनेक वर्ष उपसरपंचाची धुरा सांभाळत तीस वर्ष राजकारणातील त्यांनी परिपूर्ण आणि खंबीर नेतृत्व केलं सर्वसामान्यांना न्याय दिला.गोरगरिबांच्या गळ्यातील ताईत बनून राहिलेले मातृहृदयी उत्तमराव देशपांडे यांच्या निधनाने झरी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या जाण्याने तीस वर्षाच्या राजकारणातील तपाचा अंत झाला.त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
चाकूर तालुक्यातील नवकुंडाच्या झरीचे माजी सरपंच उत्तमराव भुजंगराव देशपांडे (वय ६५) यांचे गुरूवारी पहाटे (दि. ३ फेब्रुवारी)
लातूर येथे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित कन्या, जावई, बंधू भगवानराव, वसंतराव, बहिणी असा मोठा परिवार आहे.
राजकारणातील भीष्माचार्य माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब व पणन महासंघाचे चेअरमन आमदार बाबासाहेब पाटील यांचे ते कट्टर समर्थक परंतु स्वतःसाठी त्यांनी काहीच न मागता त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी चंदनासम झिजवले.अनेकांचा राजकारणातील प्रवेश काही मिळवण्यासाठी असतो परंतु उत्तमराव देशपांडे यांनी स्वतासाठी काहीच न मागता इतरांच्या आयुष्यातील सोन्याचे दिवस यावेत यासाठीच कार्य केले.एक सच्चा कार्यकर्ता सच्चा समाजसेवक,मातृहृदयी दिलखुलास नेतृत्व,सर्वांच्या सुखदुःखात सोबत असणारा, झरीच्या मातीतील राजकारणात आणि समाजकारणातील कोहिनूर हिरा म्हणून त्यांची ओळख निश्चितच या परिसरात होती.त्यांचे राजकारण हसत खेळत असायचे त्यांनी ओढून-ताणून कधीही राजकारण केले नाही.
भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर नागनाथ देवस्थानच्या विकासासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा दहा वर्षे गावात सरपंच पदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी झरीची ओळख लातूर जिल्ह्यात करून दिली.त्यांच्या पूर्वी झरी गावाला ओळख निर्माण करून देण्याचं काम त्यांचे चुलते (काका) प्रख्यात गायक, हार्मोनियम वादक अनेक वादनात पंडित असणारे देविदासराव देशपांडे यांनी केले ते गायन वादनात एवढे निष्णांत होते की ते उलटी पेटी करून वाजविण्यात त्यांचा हातखंडा कुणीच पकडू शकला नाही.ते प्रत्येक वाद्य वाजविण्यात ते माहिर होते त्यांनी कलेच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आणि त्यांचा राहिलेला वारसा उत्तमरावजी देशपांडे यांनी राजकारणाच्या माध्यमातून पूर्ण केला.
1995 रोजी मी सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असताना उत्तम रावजी देशपांडे यांची ओळख झाली. गावात त्यांना मालक असं म्हणायचे घरातल्या मालकाला घरातल्या संसाराची जेवढी काळजी असते तेवढीच काळजी उत्तमराव देशपांडे आपल्या गावाची करायचे, त्यांच्याशिवाय गावातला कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नसे गावातल्या प्रत्येक माणसाची काळजी करण्याचं काम उत्तम रावजी देशपांडे करायचे, गावातील ग्रामदेवताची यात्रा असो की राजकारणाचा प्रश्न असो ते स्वतः झोकून देऊन काम करायचे सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता.कोणालाच तोंड सडकून न बोलता ते प्रत्येकाला पाठीवरुन हात फिरवत काळजी नको करू होईल ते काम असं म्हणायचे, त्याच्यांत पॉझिटिव ऊर्जा निर्माण करायचे एवढ्या राजकारणात असून सुद्धा त्यांनी आमच्या शाळेत सुद्धा कधी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाही, प्रत्येक शिक्षकांना ते आवडीने बोलायचे,आम्ही सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नोकरी करत असताना गावातल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांची आमची भेट व्हायची ते आवर्जून बुद्रुक पाटील यांना सांगा असे म्हणायचे तुमचं बहारदार सूत्रसंचालन आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे असे त्यांचे वाक्य आम्हाला अजूनही आठवतात. सूत्रसंचालन,भाषण,नाटक पत्रकारिता या माध्यमातून या परिसरात काम करतांना उत्तमरावजी देशपांडे यांनी नेहमीच आम्हाला ऊर्जा देण्याचे काम केले. प्रत्येकवेळी ते आपण खूप चांगले काम करतात असं म्हणायचे दैनिक लोकमत मध्ये काम करताना महाशिवरात्रीच्या यात्रेला सिद्धेश्वर नागनाथ मंदिरावर मी मोठा लेख छापून आणायचा त्यावेळी उत्तमराव देशपांडे तोंड भरुन कौतुक करायचे तुम्ही झरी येथील सिद्धेश्वर नागनाथ मंदिर हे भारताची दक्षिण काशी अशी ओळख तुम्ही तुमच्या दैनिक लोकमतच्या लिखाणातून करून दिली असे अनेक वेळा ते बोलायचे. सिद्धेश्वराच्या मंदिरात एकदा सकाळी दर्शन घेताना आनंदराव पाटील म्हणाले सर दैनिक लोकमत मध्ये मंदिराची बातमी आली त्या वेळी लोकमत उशीरा यायचा. आनंदरावांना मी म्हणालो की कसं कुठ वाचलात आनंदराव आनंदात म्हणाले अहो अमेरिकेतू माझ्या मुलीने मला सकाळी सकाळी फोन केला. त्यावेळी उत्तम रावजी देशपांडे म्हणाले पहा आपल्या मंदिराची बातमी अमेरिकेत वाचली जाते. त्या वेळी आम्हाला खूप आनंद झाला होता.कधीही घरी गेल्यावर चहा नाश्ता घेतल्याशिवाय येऊ देत नसायचे.त्यावेळी आम्हालाही काम करण्याची ऊर्जा मिळायची.
त्यांनी राजकारणातही आपल्या विरोधकांना कधीही अपशब्द किंवा टाकून बोललेले आठवत नाही.सिद्धेश्वराच्या मंदिरात त्यांचा नेहमी वावर असायचा ते प्रत्यक्ष जातीने स्वतःला झोकून देऊन काम करायचे मंदिरातली स्वच्छता मंदिरातील डागडुजी जातीने उभी राहून काम करायचे प्रत्येकाच्या सुखा-दुखात ते उभे असायचे आई-वडिलांनी उत्तमराव नाव ठेवले ते कामही त्यांच्या नावाप्रमाणे उत्तम काम करायचे. त्यांच्या जाण्याने नक्कीच झरीच्या राजकारणातील पोकळी न भरून निघण्यासारखी आहे.
उत्तमरावजी देशपांडे यांच्या अर्धांगिनी ज्योतीताई उत्तमरावजी देशपांडे यांनी पतीच्या सोबत ज्योती सारख जळत जाऊन त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. प्रदीर्घ आजारात ज्योतीताईने त्यांना खूप मोठा आधार देत जिवाचे रान केले हाडाचा मणी आणि रक्ताचे पाणी करून त्यांनी सांभाळले. स्वतःच्या पतीला आजारात सांभाळणारी अशी भाग्यवान स्त्री एखादीच पतिव्रता असू शकते.
अशा प्रेमळ,सोज्वळ, निस्वार्थी, कर्मनिष्ठ, त्यागी, मातृतुल्य, सच्चा सेवक, कर्मयोगी, माणुसकीचा ओतप्रोत झरा, दीपस्तंभा सारखा दुसऱ्यासाठी प्रकाश देणारा, चंदना सम गंध देणारा, फुलासारखा सुगंध देणारा, नदी सारखं वाहत जाऊन इतरांची तहान भागवणारा, वृक्षा सारखं उन्हात राहून सुद्धा इतरांच्या आयुष्यात सावली निर्माण करणारा, चुकलेल्या वाटेने वाटसरूला वाट दाखवणारा, माणसातला देव माणूस गेल्याने झरीची मातृभूमी एका कोहिनूर हिऱ्याला भुमिपुत्रा पोरखी झाली आहे. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो यासाठीच हा शब्दप्रपंच उत्तम रावजी देशपांडे यांच्या चरणी समर्पित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
शब्दप्रपंच.
प्रा.मारोती बुद्रुक पाटील.
सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय झरी बु.
मो.9146411111.
9146751111.