मी असा घडलो – रामेश्वर सबनवाड
ढगेज् इंग्लिश अकॅडमीमध्ये रामेश्वर सबनवाड यांचा सत्कार संपन्न नुकत्याच जाहीर झालेल्या देशपातळीवरील युपीएससी परीक्षेमध्ये लातूर जिल्ह्यातील हाळी हंडरगुळी या गावचे सुपुत्र श्री रामेश्वर सबनवाड यांनी देशातून 202 वा रॅंक मिळवत यश संपादन केले त्यांचा सत्कार लातूर येथे ढगेज् इंग्लिश अकॅडमी मध्ये घेण्यात आला यावेळी दैनिक गोदातीरचे श्री शशिकांत पाटील मराठा सेवा संघाचे श्री उत्तमराव शेळके अकॅडमीचे मार्गदर्शक श्री व्यंकटराव ढगे सर, संचालक श्री प्राध्यापक सचिदानंद ढगे सर प्राध्यापक विवेकानंद ढगे सर व अन्य मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या रामेश्वर सबनवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी यूपीएससी परीक्षेसाठी कशाप्रकारे तयारी करावी लागते आणि यश संपादन करण्यासाठी अभ्यासा मधील सातत्य चिकाटी आणि त्यावरील अढळ निष्ठा अशा अनेक बाबी आत्मसात करावी लागतात तरच आपण यशाच्या ठरवलेल्या शिखरापर्यंत सहजपणे जाऊ शकतो हा विचार श्री रामेश्वर सर यांनी विद्यार्थ्यांना दिला यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी अभ्यास कसा करावा किती वेळ करावा त्यासाठी स्वतःला स्टेबल कसं करावं अशा अनेक बाबी संदर्भात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही रामेश्वर सर यांनी दिले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ढगेज् इंग्लिश अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांशी सुसंवाद हा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सचिदानंद ढगे सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संभाजी नवघरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विवेक ढगे यांनी केले.