शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार

शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार

अमरावती (प्रतिनिधी) : सफाई कामगार हे नेहमी लोकांच्या तिरस्काराचा विषय असतात .शहरात सर्वत्र कोरोना विषाणूचा भय असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालुन शहरात काम करणारा सफाई कामगार समाजापासून वंचित राहिलेला घटक आहे मात्र आजच्या स्थितीत सफाई कामगारांचे करीत असलेले त्यांचे कार्य समाजाला बरेच काही सांगून जात आहे तसेच आजच्या कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या बिकट परिस्थितीत सफाई कामातून समाजासाठी काम करणाऱ्या या सैनिकांना मानाचा मुजरा असल्याचे मनोगत सुद्धा सत्कार कार्यक्रमात शिक्षण सभापती आशिषभाऊ गावंडे यांनी व्यक्त केले. तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे युवा नगरसेवक तथा शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांच्या हस्ते प्रभाग क्र. 4 जमील कॉलोनी मध्ये मनपाच्या साफसफाई कामगारांपैकी उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. जमील कॉलोनी येथील उत्कृष्ठ कामगार म्हणून मीना रणजित हडाले, मयूर तुलसीदास सारसर तसेच राजेश रमेश चव्हाण यांना मनपाकडून प्रमाणित केले असून आशिषकुमार गावंडे यांनी ते प्रमाणपत्र उत्कृष्ट कामगारांना वितरित केले, याप्रसंगी शिक्षणअधिकारी डॉक्टर अब्दुल राजीक, मुख्याध्यापक श्री साईद खान (हायस्कूल )व युसूफ खान (प्रायमरी स्कूल ), स्वास्थ निरीक्षक ऐ. एम. सैय्यद व अवैस शेख, शारिक अहमद तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी गण, बिटपिऊन श्री भीम तेंडुले, मयूर सारसार व सर्व स्थाई सफाई कामगार उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!