प्राचार्य डॉ. वसंत बिरादार ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार 'जगद्गुरू तुकोबाराय साहित्य रत्न' पुरस्काराने सन्मानित

अहमदपूर (गोविंद काळे) : साहित्य, पत्रकारिता, शिक्षण क्षेत्र, प्रशासकीय सेवा आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना बीड जिल्हा जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा पहिला ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

जगद्गुरू तुकोबाराय जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील हॉटेल’ इट अँड स्टे ‘ या भव्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नंदकुमार सोमवंशी पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ. प. विष्णूआबा तपसे, प्रा. सुहास माने, डॉ.भारत हांडिबाग, मुजीब काजी, विश्वंभर वराट गुरूजी, प्रमोद जाधव , शिवश्री किसन पवार, प्रा.प्रशांत जाधव, अड.जयसिंग चव्हाण सौ.मानेताई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना मानाचा बेटा बांधून, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांचे आचरण करणे म्हणजेच त्यांची खरी जयंती साजरी करणे होय. इतिहासात अनेक लबाड्या झालेले असून, त्या शोधून तुकाराम महाराजांचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिण्याची गरज आहे. त्यांची पत्नी जिजाबाई यांचे तुकारामावर निरतिशय प्रेम होते. हे पती-पत्नी त्या भागात एक आदर्श दांपत्य होते. मात्र इतिहासकारांनी, तसेच चित्रपट, नाटक, कीर्तनातून जिजाबाईचे चित्रण कर्कशा, भांडखोर,कजाग स्त्री असे केलेले असून ते चुकीचे आहे, जिजाबाई तथा आवली ही प्रेमळ व पतीव्रता सांसारीक स्त्री होती. तिने नारायण या आपल्या मुलाला संत तुकारामासारखे कसे घडवले होते,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला प्रसिद्ध कथाकार व वक्ते डॉ.संजय खाडप, कवी केशव कुकडे, सिद्धेश्वर इंगोले, प्रा.गौतम गायकवाड, यांच्यासह अंबाजोगाई येथील मान्यवर नागरिक, महिला तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी, डॉ. मारोती कसाब, डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, अभिनंदन बिरादार, शेख हुसेन शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author