बारगजे साहेबांनी खेळली खेळी, झटक्यात जप्त केली २८ लाखाची अवैध मळी

बारगजे साहेबांनी खेळली खेळी, झटक्यात जप्त केली २८ लाखाची अवैध मळी

लातूर (दीपक पाटील) : लातूर जिल्ह्य़ात गणेश बारगजे यांनी अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत, अवैध दारू संपूर्णत नष्ट झाली पाहीजे, हा संकल्प ऊराशी बाळगुन अधीक्षक गणेश बारगजे यांनी आतापर्यंत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अवैध दारू विक्रीची माहीती मिळताच अत्यंत गोपनीय पद्धतीने त्यांची संपूर्ण टीम कामाला लागते, अशीच एक कार्यवाही दि. 4 फेब्रुवारी गुरुवारी रोजी 28 लाखाची अवैध मळी जप्त केली.

4 फेब्रुवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क लातूर जिल्हा विभागाच्या पथकाने रात्री 2-30 वाजताच्या सुमारास मौ. गोद्री, ता. औसा, जि. लातूर येथे अवैध मळी वाहतूक करीत असतांना दोन टेम्पो चारचाकी वाहन आणि 200 लीटर क्षमतेचे 65 बॅरल (13000 ली. मळी) असे एकूण 28,86,600 रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त केला. आयुक्त मा. कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, मा. जिल्हाधिकारी श्री. बी. पी. पृथ्वीराज आणि मा. विभागीय उप-आयुक्त श्री. पवार साहेब व अधीक्षक श्री. गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक बातमीनुसार मौ. गोद्री, पॉवर हाऊस जवळ, औसा, जि. लातूर येथे अवैध बेकायदेशीर वाहतुक या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कार्यवाही नोंदवत अवैध मळी वाहतूक करीत असतांना दोन क्र. MH-13-CU-5803 आणि MH-13-CU-1618 क्रमांकांचे टेम्पो अवैध वाहतूक करीत असतांना पकडले असून दोन गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये आरोपी मशाक दस्तगीर नदाफ आणि अल्ताफ नदाफ ह़या इसमांना अटक केली असून त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ड) नूसार गुन्हे नोंद केले. तसेच यामागे असलेल्या सुत्रधाराचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत घेण्यात येत आहे. सदर धाडीत 200 लीटर क्षमतेचे 65 बॅरल मध्ये 13000 लीटर मळी व इतर सर्व मिळूण एकूण रुपये 28,86,600/- एवढा अवैध मुद्येमाल जप्त केला आहे. सदर कारवाईत लातूर विभागाचे निरीक्षक श्री. आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक श्री. आर. जी. राठोड, स. दुय्यम निरीक्षक श्री. गणेश गोले, जवान श्री. अनिरुध्द देशपांडे, श्री. निलेश गुणाले, श्री. हणमंत मुंडे व श्री. ए. एम. फडणीस यांनी सहभाग नोंदविला.

आवाहन

नागरीकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येवून अश अवैध दारु विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल असे आवाहन श्री. गणेश बारगजे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी केले आहे.

About The Author