जि.प. व प.स. गटातील रिक्त पदासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर
लातूर (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग यांनी जिल्ह्यातील लातूर, चाकूर, व अहमदपूर या तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक गट अनुक्रमे 40- एकूर्गा, 23-चापोली, 02- हाडेळती व औसा तालुक्यातील निर्वाचकगण क्र. 85 खरोसा येथील रिक्त पदासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. तरी या निवडणूकीसाठी मतदार यादी व कार्यक्रम राबविण्यासाठी नियंत्रण अधिकारी व प्राधिकृत अधिकारी यांची नियुक्ती पुढील प्रमाणे आहे.
लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट एकूर्गा-40 नियंत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी, लातूर व प्राधिकृत अधिकारी तहसिलदार लातूर चाकूर तालुक्यातील-जिल्हा परिषद निवडणूक गट 23- चापोली नियंत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी, लातूर व प्राधिकृत अधिकारी तहसीलदार चाकूर, अहमदपूर- तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक गट 02- हाडोळती नियंत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी अहमदपूर व प्राधिकृत अधिकारी तहसीलदार अहमदपूर तसेच औसा तालुक्यातील पंचायत समिती निर्वावकगण 85- खरोसा नियत्रांण अधिकारी उपविभागीय अधिकारी औसा- रेणापूर व प्राधिकृत अधिकारी तहसीलदार औसा. राहतील असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.