उमेदवारांनी खर्चाचा तपशील मुदतीपूर्वी सादर करावा

उमेदवारांनी खर्चाचा तपशील मुदतीपूर्वी सादर करावा

लातूर (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब देण्यासाठी वेळ (Time) आणि रित (Manner) त्यानुसार उमेदवाराने नामनिर्देश भरल्यापूसन ते निकाल लागे पर्यंत केलेल्या खर्चांचा दैनंदिन तपशील प्रत्येक उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे दुसऱ्या दिवशी दुपारी 2-00 वाजे पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे उमेदवाराने निवडणूकीचा निकाल लागल्या नंतर खर्चाचा तपशील 30 दिवसाच्या आत तालुका स्तरावरील संबंधित प्राधिकृत खर्च पथकास सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारने वेळ व रितया प्रामणे खर्चाचा तपशील सादर केला नसेल किंवा उमेदवारांचा एकूण खर्च मार्यादेपेक्षा जास्त असेल किंवा वेळ व रितयांचे पालन झालेले नसेल तर ग्रामपंचायत अधिनियमन कलम 14-ब नुसार संबंधित उमेदवार पाच वर्षाच्या कालावधीसाठी निर्रह करण्यात येईल, असे उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

About The Author