वीज बिलाची सक्तीने वसुली नका
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद भैय्या सावे यांच्या मार्गदर्शनाखाली व लातूर शहर कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील व राष्ट्रवादी युवक प्रदेश सचीव गजानन खमीतकर यांच्या नेतृत्वात महावितरणचे कार्यकारी अभियंता बी.शेंडगे यांना देण्यात आले. लॉकडाउनच्या काळातील गोरगरीबांची विज थकबाकी आहे. परंतु महावितरणचे कर्मचारी कोणतीही नोटीस किंवा पुर्वसुचना न देता लाइट बील भरण्याची सक्ती करित आहेत व तात्काळ वीज पुरवठा खंडित करित आहेत.त्यामुळे गोरगरीब जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुर्व सुचना,नोटीस देऊन वीज पुरवठा खंडित न करता वीज बील भरण्यास सवलत द्यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी युवक शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष विशाल विहिरे, मुन्ना तळेकर, अॅड.राजेश खटके, नामदेव जाधव, प्रा.जितेंद्र गायकवाड, टिल्लू शेख, रामभाऊ रायेवार, जहाँगीर शेख, स्वप्नील दिक्षीत, बाळासाहेब पोटभरे, बस्वेश्वर रेकुळगे, अलीमभाई काजी, बरकत भाई शेख, कबीर शेख, प्रविणसिंह थोरात, सौ.मनिषा कोकणे, शिलाताई काशिकर, कबीर शेख, धिरज मुसंडे, जहाँगीर शेख, डी. उमाकांत, सोहम गायकवाड, हक्कानी एहरार, संजय गायकवाड, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.