पळशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भंडारे

पळशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भंडारे

उपसरपंचपदी दशरथ जाधव पाटील यांची वर्णी

लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा गुणवंत भंडारे तर उपसरपंचपदी दशरथ गोविंदराव जाधव पाटील यांची वर्णी लागलेली आहे. त्यांची ही निवड अध्याशी अधिकारी सचिन नरसिंगराव नरहारे, ग्रामसेवक रविंद पारेकर, तलाठी महेश साळुंके, नरसिंग जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पळशी गावचे सर्वेसर्वा देविदासरावभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्रामविकास पॅनलच्या विजयामुळे गावच्या विकासाला आता चौफेर गती मिळणार आहे.

आदर्श ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून उद्योजक उध्दवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या उमेदवारापैकी वर्षा गुणवंत भंडारे यांची पळशीच्या सरपंचपदी तर उपसरपंचपदी दशरथ गोविंदराव जाधव यांची वर्णी लागलेली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पळशीच्या विकासाला आता चौफेर गती मिळणार आहे. नुतन ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीमध्ये मिरा परमेश्‍वर जाधव, अंजलीताई चंद्रकांतराव जाधव, गंगाधर रानबा शिंदे, वंदना नानासाहेब पुरी, दिपा नामदेव उपाडे आदीचा समोवश आहे. त्यांच्या या निवडीबद्दल उद्योजक उध्दवराव जाधव, खंडू पवार, दिगंबर जाधव, दगडूसाहेब जाधव, बब्रुवान शिंदे, हणमंत जाधव, चंद्रकांत जाधव, मनोज जाधव, परमेश्‍वर जाधव, दत्ता भोसले, गुणवंत भंडारे, केशव गिरी, सिध्देश्‍वर जाधव, केशव पांचाळ, बाळासाहेब जाधव, विठ्ठल भारती, श्रीनिवास जाधव, मोतीराम जाधव, पांडूरंग जाधव, हाणमंत जाधव, राजाभाऊ जाधव, पवन जाधव, धनेश्‍वर शिंदे, काका शिंदे, धर्मराज गव्हाणे, गोर्वधन गव्हाणे, सिद्राम जाधव, महेश जाधव सुदाम जाधव, विश्‍वनाथ जाधव, बळीराम शिनगारे, उध्दव भंडारे, अमोल जाधव, शरद पवार आदींनी अभिनंदन केले.

About The Author