व्हटी सायगावच्या सरपंचपदी अंगद मुंडे तर उपसरपंचपदी सुशिलाबाई सूर्यवंशी
रेणापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांच्या हस्ते नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्य सदस्यांचा सत्कार
रेणापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील व्हटी सायगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंगद विनायक मुंडे उपसरपंचपदी सुशिलाबाई हरिदास सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
या निवडीच्या वेळी अध्यासी अधिकारी के आर पौळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन सदस्यांच्या सभेत ही निवड करण्यात आली सरपंच पदासाठी एकमेव अंगद मुंडे तर उपसरपंच पदासाठी सुशिलाबाई सूर्यवंशी यांचे एकमेव अर्ज आल्याने पौळ यांनी सरपंच म्हणून अंगद विनायक मुंडे व उपसरपंच पदासाठी सुशिलाबाई हरिदास सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक अमोल मुंडे, तलाठी तडके यांच्यासह नूतन सदस्य शाम संपतराव सूर्यवंशी, ज्ञानोबा गायकवाड, सुदामती सुरवसे, गयाबाई संपते उपस्थित होते यावेळी नूतन सरपंच व उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या निवड प्रक्रियेच्या वेळी पॅनल प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश सूर्यवंशी, सूर्यकांत सूर्यवंशी, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद जाधव, रवि सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी, संपत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.