इनरव्हिल क्लब च्या वतीने ‘मकरसंक्रांती ‘ निमित्य ‘हळदी–कुंकवा’ चा कार्यक्रम उत्साहात

इनरव्हिल क्लब च्या वतीने 'मकरसंक्रांती ' निमित्य 'हळदी–कुंकवा' चा कार्यक्रम उत्साहात

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर इनरव्हिल क्लब च्या वतीने येथील संस्कृती गार्डनमध्ये मकरसंक्रांती ‘ निमित्य ‘हळदी–कुंकवा’ चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा डॉ.मिनाक्षी करकनाळे होत्या, उद्घाटक म्हणून अहमदपूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सुविद्या पत्नी सौ.चंदाभाभी पाटील तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून लिनाताई पाटील, दर्शना हेंगणे, प्राचार्या रेखाताई तरडे (हाके), माजी सभापती अयोध्याताई केंद्रे उपस्थित होत्या.

यावेळी देशासाठी लढता-लढता वीर मरण आलेल्या जवानांच्या १० वीर पत्नी व वीरमातांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मायेची शाल, छत्री, वाण, तिळगूळ देऊन सत्कार करण्यात आला .तसेच शहरातील गरीब, होतकरू आणी गरजू अशा २० भाजी विक्रत्या महिलांचा हि मायेची शाल, पाऊस व उन्हापासून रक्षण होण्यासाठी छत्री, वाण व तिळगूळ देऊन प्रमुख पाहुण्याच्या व क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजी विक्रत्या भागीनीनी आमच्या कामाची नोंद घेऊन क्लबने सत्कार केल्यामुळे क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कुंभाराकडून १२०० कुंड्या तयार करून घेऊन एक गरीब होतकरू कुंभाराला २५,००० रु.चा रोजगार मिळवून देण्यात आला. वेळेवर कुंड्या तयार करून दिल्याबद्दल क्लबतर्फे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. महिलांना वाण म्हणून मातीची कुंडी व १२०० रोपांचे वाण देण्यात आले.

या हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमात आकर्षण सेल्फी पॉइंट व स्लोगन पाट्या तयार करून कॉविड-१९ लस, भ्रनहत्या, पाण्याचा योग्य वापर, वृक्षारोपन काळाची गरज, व्यसन मुक्ती ई.बाबीचा संदेश देण्यात आला. याप्रसंगीआमदार बाबसाहेब पाटील यांच्या पत्नी सौ.चंदाभाभी पाटील यांनी कोरोनाच्या महामारी नंतर एवढ्या मोठया प्रमाणात तिळगूळाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्व कल्ब चे अभिनंदन करून असेच उपक्रम करून एकमेकांबद्दल जिव्हाळा, प्रेम, स्नेह, निर्माण करावा असे आवाहन केले. तसेच माजी सभापती सौ.अयोध्याताई केंद्रे यांनी आपापसातील हेवेदावे विसरून सर्व भगिनींनी एकमेकांशी अतिशय प्रेमाने राहावे असे उद्गार काढले “तिळाची स्नेग्धता,गुळाचा गोडवा,नेहमीच आपल्या जीवनी राहावे असा संदेश दिला. अध्यक्षीय समारोपान क्लब अध्यक्षा सौ.डॉ.मिनाक्षी करकनाळे यांनी मकरसंक्राती सणाचे महत्व, थंडीच्या दिवसात आहार व आरोग्याचे महत्व सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट प्रमुख मा.अध्यक्षा सौ.शैलजा सांगवीकर, सचिव सौ.डॉ.भाग्यश्री यलमटे, प्रा.सारिका उगिले,आरती गादेवार यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यसस्वी होण्यासाठी सर्व कल्ब सदस्या परिश्रम घेतले. अतिशय आनंदाच्या वातावरणात बंगाली थीम घेऊन “मकरसंक्रांतीचा” सण साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अशा रोडगे (तत्तापुरे) सौ.कलावती भातंब्रे यांनी करून सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ. वर्षा भोसले, शिल्पा हंगरगे, डॉ. सुचिता कापसे, विनया देशमुख, शितल वलसे, विजया भुसारे, अनिता शिंदे, सुनिता जगताप, अर्चना मजगे, शितल मालू, ज्योती काळे यांच्यासह महिला भगीनी उपस्थित होत्या.

About The Author