अहमदपूर येथे पेट्रोल पंपावर मनसेचे बोंबाबोंब आंदोलन
पेट्रोल डिझेल दरवाढीचा केला निषेध
अहमदपूर (गोविंद काळे) : येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली अनेक दिवस पेट्रोल डिझेल च्या होत असलेल्या दरवाढीचा जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करत जाधव पेट्रोल पम्प येथे उघडे बोंबाबोंब आंदोलन केले.जागतिक बाजारपेठेत कच्या तेलाचे दर निम्म्याहून कमी येऊनही आज पेट्रोल चे दर प्रतिलीटर शंभर रुपये तर डिझेल ऐंशी रुपयांपेक्षा जास्त एवढे भयानक झाले आहेत.तरीही केंद्र व राज्यशासन जागे होत नाही.कारण 2014 साली शासनाला पेट्रोल/डिझेल मधून जो कर पन्नास हजार कोटी मिळत होता तो आता एक लाख पंधरा हजार आठशे कोटी मिळत आहे.यात एक लिटर पेट्रोल मध्ये 25 रुपये केंद्राला तर 25 रुपये राज्याला व बाकीची पेट्रोलची मूळ किंमत व प्रतिलीटर डिझेल मध्ये 18 रुपये केंद्राला व 11 रुपये राज्याला व बाकीची डिझेल ची मूळ किंमत असे कर मिळत आहेत.त्यातूनच सव्वा लाख हजार कोटींचा निव्वळ कर शासन वाहनधारकांकडून काढून त्यांना नागवत आहे याचा तीव्र निषेध करत मनसेने हे उघडे बोंबाबोंब आंदोलन केले.
चौकट
[पेट्रोल डिझेल विक्रीला जीएसटी का लागू नाही?डॉ नरसिंह भिकाणे एवढा गाजावाजा करत जीएसटी एक देश एक कर म्हणून लागू केली तर त्यातून पेट्रोल व डिझेल का वगळले?अनेक कर न लावता सर्वात अधिक जीएसटी जरी यासाठी लावली तर तेलाच्या किमती किमान बावीस रुपयांनी कमी होतील असे डॉ भिकाणे म्हणाले. रस्त्यावर टोलकर व वाहनात पेट्रोलचे केंद्रकर व राज्यकर या दुहेरी करकरीने जनता नागवली जात आहे असेही ते म्हणाले.]
या आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ मिलिंद साबळे,शहराध्यक्ष अतिष गायकवाड,मदन पलमटे, गणेश शेटकार, रत्नाकर पिटाळे, कांतिराम पेंड,कार्तिक भिकाणे, सिकंदर शेख,दत्ता पांगरे, सोनवणे अक्षय आदी उपस्थित होते.