अपंगाना मदत करणे हिच खरी ईश्वर सेवा आहे – आमदार बाबासाहेब पाटील 

अपंगाना मदत करणे हिच खरी ईश्वर सेवा आहे - आमदार बाबासाहेब पाटील 

अहमदपूर( गोविंद काळे ) आलेल्या अपंगत्वावर मात करून त्यांच्यातील  कमीपणाची भावना दूर करण्यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. अपंगाची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित दिव्यांग व्यक्तीला सायकल व इतर साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी सभापती श्रीमती गंगासागर दाभाडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जि प सदस्य अशोक केंद्रे ,मुद्रिकाताई भिकाने सुमन ताई सूनेवाड , उपसभापती बालाजी गुट्टे गटविकास अधिकारी आदेलवाड,प.स.सदश्य,माणिक नरवटे, सभापती, शिवानंद हेगणे, शिवाजीराव देशमुख, निवृत्ती कांबळे, प्रशांत भोसले, अशोक सोन कांबळे, अनिस कुरेशी,आदी उपस्थित होते .

पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, जगातील अनेक विक्रमांची नोंद अपंग व्यक्तीच्या नावे आहे म्हणून अपंग व्यक्ती ने कमीपणाची भावना न ठेवता जिद्दीने वाटचाल केली पाहिजे समाजाने सुद्धा. देणे जो आनंद आहे लेने मे नही या भावनेतून अपंगाला मदत केली पाहिजे त्यांना जगण्याची उमेद मिळेल ,आचारसंहितेमुळे साहित्य वाटपाला उशीर झाला या पुढील काळात अपंगांना विविध योजनांचा लाभ मिळविण्यात अडचणी येऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.  

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना गट विकास विकास अधिकारी आदेलवाड, यांनी सांगितले की तालुक्यातील1143जणानी  घेतलेल्या शिबिरात सहभाग नोंदवला होता त्यापैकी प्रथम टप्प्यात 757 लाभार्थ्यांना साहित्य प्राप्त झाले आहे.ज्याचे प्रातिनिधिक स्वरूपात येथे वाटप करून जि प सर्कल निहाय खालील प्रमाणे त्याच्या तारखेला वाटप करण्यात येणार आहे.त्यात  अंध 77, अस्थिव्यंग 392 ,कर्णबधिर 182 ,106 एकूण 757 ला घरपोच साहित्य देण्यात येणार आहे.

About The Author