जाचक कायदे रद्द करण्यासाठी आघाडीचा ट्रॅक्टर मोर्चा
अहमदपूर (गोविंद काळे) : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या तसेच इंधन दरवाढी विरोधात अहमदपूर – चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टरचा धडक मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, राष्ट्रवादी उपजिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवानंद हेंगणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड हेमंत पाटील ,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष विलास पवार यांची उपस्थिती होती.
सदरील मोर्चा महात्मा गांधी महाविद्यालय येथून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी चौक मार्गे अहमदपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी १५० पेक्षा जास्त ट्रॅक्टर आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते मंचकराव पाटील, काँग्रेसचे चंद्रकांत मद्दे ,शिवाजी खांडेकर, तुकाराम पाटील ,माधव जाधव, सिराज जागीरदार ,शिवाजीराव काळे ,अनिल वाडकर, उत्तम माने, संदीप चौधरी, अझहर बागवान, विकास महाजन, गोपीनाथ जोंधळे, अफ्रोज शेख, प्रशांत भोसले ,डॉक्टर फुजेल जागीरदार ,अभय मिरकले, बाळासाहेब पाटील आंबेगावकर,जावेद बागवान गंगाधर ताडमे,भैय्या शेख,गोपाळ कानवटे, वेंकट वंगे, अविनाश मंदाडे, भारत सांगवीकर, बाळासाहेब बेडदे फिरोज शेख, श्याम देवकते, अनिल बेंबडे, इलियास सय्यद ,गणेश जाधव, तानाजी राजे ,शेखर चौधरी, सुशील गोटे, शैलेश जाधव, मोहन पाटील ,हणमंत पेड, सचिन पडिले, बालाजी तीडोळे ,तानाजी राजे ,धनराज गिरी, अशोक सोनकांबळे सह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी अहमदपूर उपविभागीय अधिकारी श्री प्रभोदय मुळे यांना आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायदे तात्काळ मागे घ्यावेत व शेतकऱ्यावरील अन्याय दूर करावा तसेच पेट्रोल डिझेल ची मोठ्या प्रमाणात झालेली दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, शेतकर्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.