नागझरी ग्रामपंचायत सरपंच पदी रामकिशन सुर्यवंशी तर उसरपंच पदी उध्दव इप्पर यांची बिनविरोध निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायत सरपंच पदाची नुकतीच निवड करण्यात आली असुन सरपंच पदी रामकिशन सुर्यवंशी तर उपसरपंच पदी उध्दव इप्पर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यात नुकत्याच सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुका झाल्या असुन नागझरी गावचे भुमिपुत्र पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त मंचक यांच्या मध्यस्थीने गावात सलोख्याचे वातावरण रहावे तंटे वाद विविद होऊ नये व गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गावातील सर्व सुजाण नागरीकांच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध काढण्यात आली असुन सध्या संपूर्ण तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडती नंतर सरपंच पदाची निवड प्रक्रिया चालु झाली असल्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत नागझरी ग्रामपंचायत सरपंच पदी रामकिशन सुर्यवंशी तर उपसरपंच पदी उद्धव इप्पर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
चौकट :
मा. आयपीएस मंचक इप्पर (पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड) यांच्या मध्यस्थीने व गावातील सर्व सुजाण नागरिकांच्या सहकार्याने ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध निघाली आहे. फक्त विकासाच्या मुद्यावर जनतेला सहकार्य मागितले होते आणि ते जनतेने स्वीकारले. निवडणुकीत सर्वत्र पैशाचा घोडे बाजार चालू असताना आमच्या गावामध्ये कुठलीच पैशाची मागणी नाही ना गावाच्या नावावर ना देवाच्या नावावर. जेवढा लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे तेवढा विश्वास टिकवून ठेवण्याचा आमचे सदस्य प्रयत्न करतील असे उद्गार पोलीस फ्लॅश न्युजशी बोलताना उपसरपंच उद्धव इप्पर यांनी काढले. यावेळी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध काढल्या बद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले या बिनविरोध निवडली बद्दल तालुक्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे