अहमदपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरणच्या विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

अहमदपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरणच्या विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे) : लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला महावितरणने भरमसाठ वीजबिले देऊन आघाडी सरकारने मोठ्या विजबिलाचा शॉक दिला. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी सवलत देण्याचे जाहीर केले होते. दरम्यान बिलाबाबत सवलत देता येणार नाही, नागरिकांना बिले भरावीच लागतील असे स्वतः ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट सांगितल्याने वीज महावितरण कंपनी सक्तीने वाढीव वीजबिलाच्या वसुलीसाठी नोटिसा पाठवत आहे आणि त्यांचे कनेक्शन तोडत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भरमसाठ वीजबिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी आणि त्यांच्या तुघलकी कारभारविरोधात पक्षाचे पॅनलिष्ठ गणेश दादा हाके यांच्या नेतृत्वाखाली आज अहमदपूर येथे टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षाचे अहमदपूरचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देवकत्ते, पंचायत समिती उपसभापती बालाजी गुट्टे, परमेश्वर पाटील, संतोष कोटलावर, प्रताप पाटील, दत्तात्रय जमालपुरे, बाळासाहेब होळकर, गोविंद बैकरे, अर्जुन गंगथडे, श्याम यादव, सय्यद आरेफ, माधव मुंढे, बबलू पठाण, दिपक देवकत्ते, नागेश केंद्रे, गंगाधर हेंगणे, अनंत गुट्टे, ऋषी गुट्टे, आदि कार्यकर्ते सहभागी होते.

About The Author