सेवानिवृत्त जवान अशोक कांडणगीरे यांचा ग्रामस्थांच्या वतिने जंगी सत्कार
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना गावचे भूमिपुत्र अशोक कांडणगीरे यांचा भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर गावी प्रथमच आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतिने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी श्री.संत सदगुरुनाथ महाराज संस्थानचे मठाधीपती श्री.ईरन्नाथ महाराज, माजी सभापती दिलीपराव देशमुख, कृषी सहाय्यक राजेश उगीले आदी. मान्यवर उपस्थित होते. अशोक कांडणगीरे हे सन २००४ साली सैन्यदलात भरती झाले. रामगड (झारखंड) येथुन सेवेची सुरवात करुन लेह, लद्दख (जम्मु कश्मीर), भोपाळ, आसाम, पुणे,अरुनाचल प्रदेश, पटीयाला (पंजाब) अशी १७ वर्ष भारतमातेची सेवा करुन ते सेवानिवृत्त झाले आहेत. मंगळवारी त्यांचे सायंकाळी सेवानिवृत्तीनंतर प्रथमच जन्मगावी आगमन झाले असता उजना ग्रामस्थांनी त्यांची गावात वाजत-गाजत भव्य मिरवणुक काढुन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया:
“लहानपणापासुनच माझे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. वयाच्या १७ वर्षी सैन्यदलात भरती झाली. मला देशसेवा करण्याचे भाग्य मिळाले. आत्ता सेवानिवृत झाल्यानंतर काळ्या आईची सेवा करण्याचे ठरवले असुन पुर्णवेळ आधुनिक पद्धतीने शेती करणार आहे.” – अशोक कांडणगीरे (माजी सैनिक)