कोपरा ग्रामपंचायतीत नवीन रमाई घरकुल आणि बाला उपक्रमाचा गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड यांनी घेतला आढावा

कोपरा ग्रामपंचायतीत नवीन रमाई घरकुल आणि बाला उपक्रमाचा गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड यांनी घेतला आढावा

प्रत्यक्ष गटविकास अधिकारी कोपरा शाळेत

किनगांव (गोविंद काळे) : मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न ,वस्त्र , निवारा ,आरोग्य आणि शिक्षण होय या गरजा भागविण्याचा प्रयत्न मानव करत असतो याची जबाबदारी शासन घेऊन सोडविण्याचा अविरतपणे प्रयत्न करते प्रत्येक मानवाला पोटभर अन्न , अंगभर कपडे, आणि राहण्यास स्वतःचे सुंदर घर असावे असे वाटते या अनुषंगाने शासन स्तरावर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील लोकांसाठी स्वतःचे सुंदर आणि स्वच्छ घर असावे बेघरांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजना राबविली जात असताना ज्यांना घराची आवश्यकता आहे त्यांना लाभ मिळतो की नाही आणि ज्यांना लाभ मिळाला ते प्रत्यक्ष घरात राहतात काय ?नवीन रमाई घरकुलसाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी प्रत्यक्ष घराचे बांधकाम सुरू केले आहे काय? मनरेगा चे इंजिनियर राहुल कोराळे ,ग्रामसेवक रविंद्र क्षिरसागर, सरपंच गंगाधर देपे, उपसरपंच प्रा बालाजी आचार्य, कार्यरत आहेत काय? यासंदर्भात आणि इतर विकास योजनांचा आढावा त्याच बरोबर मनरेगाच्या माध्यमातून 90 दिवसाचा रोजगार आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेले शौचालय वापरासाठी प्रवृत्त करणे, गायरान आणि गावठाण जमीनीवर होत असलेले अतिक्रमण रोखणे, अतिक्रमण करणाऱ्यावर कडक पोलीस दंडात्मक कारवाई करणे, कर वसुल करणे, स्वच्छ पाणी पुरवठा करणे, शेतकऱ्यासाठी शिवरस्ते पांदन रस्ते आणि एमआरईजीएस मार्फत विहीरी घेणे आदि गावातील विकास कामे यासंबंधीचा आढावा मंगळवार दि ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं ५ .००अहमदपूर तालुक्यातील कोपरा ग्रामपंचायतीत घेत असताना अपंग दिव्यांग यांना काय मदत केली गावातील अंगणवाडी ,जिल्हा परिषद केद्रिय प्रा शाळा यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून बाला उपक्रमांतर्गत शाळेची रंगरंगोटी, प्रेरणास्थान महापुरुषांचे फोटो ,चित्र प्रदर्शने, उजळणी, स्वयं अध्यापनाचे धडे मिळणारे दिशादर्शक फलके , नकाशे आदिमुळे बालकांच्या बुध्दीला चालना मिळेल सृजनशील विद्यार्थी बनविण्यासाठीची तयारी कशी आणि किती झालेली आहे याचा आढावा घेऊन प्रत्यक्ष गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड जि प के प्रा शाळा कोपरा येथे गेले आणि प्रत्यक्ष पाहणी करून बाला उपक्रमाच्या कामाचे कौतूकही केले काही सुचनाही उपस्थीत ग्रामसेवक रविंद्र क्षिरसागर, संगणक परिचालक शिवाजी पिटाळे,सेवक अंगद गोरे, संतराम तरुडे, सरपंच गंगाधर देपे, उपसरपंच प्रा बालाजी आचार्य,व्हा चेअरमन मधुकर सुर्यवंशी, विस्तार अधिकारी डी व्ही सुडे, घरकुलचे इंजि राहुल कोराळे, इंजि अनिल मिरकले, नरेगा इंजि शिवम फुलारी, स्थापत्य अभियंता विशाल भोसले ,केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद केंद्रे आणि शिक्षकाना देऊन ग्रामपंचायत विकास कामात अग्रेसर असल्याचे समाधान मानले.

About The Author