कोण म्हणतंय गुटख्याला बंदी? विठ्ठल करतोय निलंगा येथे खुलेआम विक्री
निलंगा (दिपक पाटील जिल्हा प्रतिनीधी) : राज्यात गुटखा बंदी असली तरीही ईतर राज्यातून गुटखा आणला जात असल्याची माहीती सुञाकडून देण्यात आली, यात प्रामुख्याने कर्नाटक व आंध्रप्रदेश येथून गुटखा आणला जात असून, सर्वाधिक गुटखा कर्नाटक मधून आणला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची गोदामे असून, हा गुटखा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवणारी मोठी यंत्रणा आहे, अशी माहिती काही लोकांकडून सांगितली जाते. कोरोणामुळे सर्वत्र लाॅकडाऊन झाला होता. त्यामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, तर काहींना खायला अन्न देखील मिळाले नाही, मात्र लातूर जिल्ह्य़ातील निलंगा येथे व्यसनी लोकांचे चोचले पुरवले जात आहेत. राज्य सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी आणली असली तरीही त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासन गेल्या चार महिन्यांपासून अनेक ठिकाणी धाडी टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली, मात्र निलंगा तालुक्यातील विठ्ठल हा ईनामदार असल्याचे ढोंग करत किराणा मालाचे व्यापारी असल्याचे भासवून आपला गोरख धंदा चालु केला आहे. चालू असले तरीही ते कोणाला माहीत कसे होत नसतील? विठ्ठल ईमानदार ला कोणाचा वरदहस्त आहे का? याची उलट सुलट चर्चा बाजारात होत असते, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्था मध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेट सारख्या घातक घटकांमुळे कॅन्सर सारखा गंभीर आजाराचा सामना करावा लागतो, तंबाखूजन्य पदार्थामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी राज्य सरकारने २०१२ पासून गुटख्याची निर्मिती व विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे, या निर्णयाला १० वर्ष उलटली मात्र कायद्यातील पळवाटा आणि सरकारी यंत्रणांची नजर चुकवून छुप्या मार्गाने आणि चढ्या दराने गुटखा राजरोस पणे विक्री चालू आहे. निलंगा शहरात कोणत्या ही पानटपरी वर हा प्रतिबंधात्मक असलेला गुटखा उपलब्ध असतो.
ओळखीच्या लोकांनाच मिळतो गुटखा राज्यात गुटखाबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते, कार्यवाही होऊ नये म्हणून दुकानदाराकडून फक्त नेहमीच्याच ग्राहकांना गुटखा विक्री केली जाते. नवीन विक्रेत्यांना गुटखा विकताना बर्याच चौकशीच्या फेऱ्यांचा सामना करावा लागतो. गुटखा विक्री करताना नेहमीच्या तुलनेत जास्त पैसे द्यावे लागतात, गुटख्या ला पर्याय म्हणून घासून सुपारी दिली जाते, त्यामध्येही तंबाखूचा वापर होत असल्याने तो तयार करणे आणि त्याची विक्री करणे बेकायदेशीर आहे. याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे सर्वच पानटपरी वर घासून सुपारी दिली जाते, तरूणाईला व्यसन जडल्याने पानटपरी वर नेहमीच गर्दी दिसून येत असते. याकडे अन्न भेसळ विभाग व पोलीस प्रशासन लक्ष देणार का? निलंगा येथील गुटखा बंद होईल का? अशी चर्चा जनसामान्य लोकात होत आहे .