लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उत्कृष्ठ आर्थिक गुंतवणुकीचा पुरस्कार जाहीर
सहकारी बॅंकेला देण्यात येणारा २०२० अवॉर्ड लातूर बँकेला प्रदान
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक क्षेत्राशी निगडित घडामोडींचे विश्लेषण करणारी नामांकित संस्था banking frontiers in Co- operative banking award (fcba)२०२० या वर्षासाठी large catagiri and small catagiri मध्ये पुरस्कार दिला जातो त्या अनुषंगाने २३ जानेवारी २०२१ रोजी बँकेची सदृढ आर्थिक परिस्थिती व गुंतवणुकीसाठी सहकारी बँकांमधून large catagiri मधून best investment initiatives award २०२० पुरस्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस प्राप्त झाला असून सदरील पुरस्कार ऑनलाइन virtual platforms द्वारे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात प्रदान करण्यात आला आहे.
राज्यात सहकार क्षेत्रात विशेषतः जिल्हा बँकात लातूर बॅंक राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून मराठवाडा विदर्भ राज्यात प्रथम क्रमांकावर असलेली लातूर जिल्हा बँक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेने पारदर्शक कारभार करीत राज्यात अग्रेसर बॅंक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे लोकनेते विलासराव देशमुख बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेने आतापर्यंत राष्ट्रीय, राज्य पातळीवरील तसेच राज्य शासनाचे असे एकूण ३५ पेक्षा अधिक पुरस्कार बँकेस मिळाले आहेत.
लातूर जिल्हा बॅंकेने ग्राहकांसाठी अनेक निर्णय घेत शेतकरी सभासदांना ३ लाख रुपयांपर्यंत बिन व्याजी कर्ज देण्याचा निर्णय, अद्यावत कोअर बॅंकिंग प्रणाली, ए टी एम, संगणक, तात्काळ ग्राहक सेवा, तसेच रेशीम कर्जासाठी बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेवून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आदी सुविधा देवुन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्यातील प्रत्येक गावात ग्राहकांशी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे हे विशेष आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री सहकार महर्षी बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख, बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, सन्माननीय संचालक यांनी बॅंकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.