सारोळा-मसोबा पाटी रस्त्याची तातडीने वर्क ऑर्डर करून काम सुरू करा

सारोळा-मसोबा पाटी रस्त्याची तातडीने वर्क ऑर्डर करून काम सुरू करा

ग्रामपंचायत सदस्य बाकले यांची मागणी

उस्मानाबाद (प्रशांत नेटके) : उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा – शिंदेवाडी – मसोबा पाटी हे रस्ताकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजूर असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराला अद्याप कामाची वर्कऑर्डर मिळालेली नाही. रस्त्याअभावी वर्षेनुवर्षे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने कामाच्या वर्कऑर्डरची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात काम सुरू करावे, अशी मागणी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांची गुरूवारी (दि.२५) भेट घेवून केली आहे.

सारोळा-शिंदेवाडी-मसोबापाटी हा ५.४५ किमी रस्त्याची गत अनेक वर्षापासून दूरवस्था झाली आहे. शेतकरी, प्रवाशी, ग्रामस्थांसह वाहन चालकांना मोठे हाल सोसावे लागत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत हे रस्ताकाम मंजूर करण्यात आले आहे. तसेच या कामाची ई-निविदाही काढण्यात आली. तसेच हे काम संबंधित एजन्सीलाही मिळालेले आहे. मात्र अद्याप कामाची वर्कऑर्डर (कार्यारंभ आदेश) कार्यालयाकडून देण्यात आलेला नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून हे काम सुरू करण्यात आलेले नाही. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांची सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांनी गुरूवारी (दि.२५) भेट घेवून तातडीने वर्कऑर्डरची प्रक्रिया पूर्ण करून रस्ताकाम सुरू करण्याची मागणी केली आहे. रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत असून याची दखल घेवून कामाचा ‘श्रीगणेशा’ करण्याची मागणीही बाकले यांनी केली आहे. तर श्रीमती पाटील यांनी एक महिन्याच्या आत वर्कऑर्डर देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

About The Author