पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचा कबड्डीचा संघ जिल्हा पातळीवर
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील मौजे तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 19 वर्ष वयोगटातील कबड्डीच्या संघाने तालुकास्तरावर सर्वप्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर मजल मारली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तोगरी सर्वच क्षेत्रांमध्ये सतत अग्रेसर असते. उदगीर तालुका पातळीवर झालेल्या क्रीडा स्पर्धा देखील या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या संघातील खेळाडूंचे संस्थेचे कार्याध्यक्ष महेश मनोहरराव येरनाळे, प्राचार्य श्रीमती वंदना गुरुनाथराव बिराजदार, उपप्राचार्य गुणवंतराव काळगापुरे, पर्यवेक्षक लक्ष्मण लोभाजी, सुनील पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघातील खेळाडूंचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा ही दिलेल्या आहेत.
