ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुलचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश
औसा (एल.पी.उगीले): लातूर जिल्हा क्रिडा विभागाच्या वतीने तालुका स्तरीय कराटे स्पर्धा रामनाथ विद्यालय, आलमला येथे संपन्न झाल्या. सदरील स्पर्धेमध्ये आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल मधील सहभागी विद्यार्थी कावाले अनिकेत गोरोबा (वयोगट 17 वर्षे), सुरवसे ऋतुजा सिध्देश्वर (वयोगट 14 वर्षे), सुरवसे ऋषीकेश सिध्देश्वर (वयोगट 14 वर्षे)या खेळाडू विद्यार्थी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक गायकवाड अनिकेत अण्णासाहेब (वयोगट 17 वर्षे) व दुधनकर समृध्दी विशाल (वयोगट 17 वर्षे) यांनी प्राप्त केला.
रोमांचक कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या खेळाडूंची निवड जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झालेली आहे.सदरील यस्वस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक शेख मंजुरपाशा यांचा सत्कार संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य स्वाती कापसे, सायन्स कॉलेजचे प्राचार्य योगेश माशाळकर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, शाळेच्या प्राचार्या स्वाती कापसे, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व खेळाडू विजेत्यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.
