भाकसखेडा येथे पर्यावरण जनजागृती कार्यशाळा संपन्न

भाकसखेडा येथे पर्यावरण जनजागृती कार्यशाळा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील भाकसखेडा येथे कारवॉ फाऊंडेशन उदगीर व वि.का.स.से. सो. गंगापूर– भाकसखेडाच्या वतीने जि. प. शाळा भाकसखेडा(प) ता. उदगीर येथे जिल्हा परिषद शाळा व स्वामी दयानंद सरस्वती विद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी सीडबॉल कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

लहान मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी व वृक्षारोपणाचे महत्व त्यांच्या मनात रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक जाधव, चेअरमन वि.का.सो. गंगापूर, प्रमुख पाहुणे कारवॉ फाऊंडेशनच्या अध्यक्ष्या आदिती पाटिल कौळखेडकर, उपसरपंच अरविंद मोरे, लिंबाजी खेडकर, ओंकार गांजुरे, गुरुप्रसाद पांढरे, शुभम पाटील. मुख्याध्यापक रमेश जाधव तसेच सहशिक्षक खंडेराव शिंदे , उमाकांत कंजे, दशरथ मायबोने , सलीम शेख , राजेश काळे , विठ्ठल केदार , सौ. अनिता पांचाळ , सौ. संतोषी लादे(जाधव), आनंद जाधव , दत्ता बुर्ले, अभिषेक जाधव आदि उपस्थित होते.

सीडबॉल कसे तयार करावेत? व त्याचा उपयोग कसा करावा?, रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम, वृक्षसंगोपनाचा फायदा या विषयांवर आदिती पाटिल यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!