श्यामलाल हायस्कूलच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरीय निवड

श्यामलाल हायस्कूलच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरीय निवड

उदगीर : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचा शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय 14 वर्षाखालील आणि 17वर्ष वयोगटाखालील क्रिकेट क्रीडा स्पर्धे मध्ये दोन्ही संघाचा प्रथम क्रमांक आलेला आहे. व या संघाची जिल्हास्तरीय निवड झालेली आहे.

श्यामलाल हायस्कूलच्या क्रिकेट संघाच्या या घवघवीत यशा बद्दल संस्था अध्यक्ष सुपोषपाणि आर्य, संस्था उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, संस्था सचिव ऍड.विक्रमजी संकाये, संस्था सहसचिव अंजुमनी आर्य यांनी सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये तसेच सर्व शिक्षक बंधू,भगिनी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचे व क्रीडा प्रमुख दिनेश बोळेगावे, सहाय्यक राजकुमार बिराजदार यांचे अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!