तोगरीच्या नेहरू विद्यालयाची खो खो स्पर्धेत जिल्हास्थरावर निवड,सर्वत्र आभिनंदन

तोगरीच्या नेहरू विद्यालयाची खो खो स्पर्धेत जिल्हास्थरावर निवड,सर्वत्र आभिनंदन

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथे पार पडलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संघाची जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यासोबत खो खो मध्येही तालूक्यात प्रथम येण्याचा मान याच विद्यालयाने मिळवला आहे. १९ वर्षाखालील वयोगटामध्ये या विद्यालयाच्या संघाने कबड्डी व खो खो मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.या संघाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या संघात तेलंग अदित्य,नागुरे अदित्य, तांबोळी यासीन,वाडेकर करण, सुर्वंशी अदित्य, शेख महंमद जुबेर, तांबोळी जुबेर,ममदे पवन, तेलंग प्रशांत, गौरी कुमार , तेलंग अनिकेत, गायकवाड सुरज यांनी भाग घेतला. तसेच २०० मिटर धावणे या स्पर्धेत कु रेणूका गुणवंत शिवणकर ही तालुक्यात सर्व प्रथम आली आहे.

संघातील सर्व खेळाडूंचे संस्थेचे कार्याध्यक्ष महेश मनोहरराव येरनाळे, प्राचार्या वंदना बिराजदार, उपप्राचार्य गुणवंत काळगापुरे, पर्यवेक्षक लक्ष्मण लोभाजी, संस्थेच्या सदस्या मंजूषा पाटील, बस्वराज पाटील, प्रा. नाईकवाडे व प्रा. सुनिल पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार केला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!