गांधी विचार चिरकाळ टिकणारा – जेष्ठ पत्रकार अमर हबीब
उदगीर (एल.पी.उगीले) : महात्मा गांधीजींची हत्या झाली असली तरी त्यांचे विचार कधीच संपणार नाहीत. म. गांधी यांचे।विचार कथेच्या माध्यमातून नवीन पिढीपुढे नेले पाहिजेत. असे विचार जेष्ठ पत्रकार तथा आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी व्यक्त केले.
आंतरभारती शाखा उदगीर जिल्हा लातूरच्या वतीने आंतरभारती परिवाराचा स्नेहमिलन मेळावा उदगीर येथे रविवारी संपन्न झाला. या स्नेहमिलन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
व्यासपीठावर आंतरभारतीचे सचिव डॉ. डी.एस. कोरे, उपाध्यक्षा संगीता देशमुख, कोषाध्यक्ष उमाकांत चेनशेट्टी, ट्रस्टी मनिषाराणी आर्य, मधुश्री आर्य, आंतरभारतीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव आपटे, राम माने, ज्योती शिंदे आदि उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रीय युवा योजनेचे संस्थापक डॉ. एस.एन.सुब्बाराव (भाईजी), आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. उषाताई तोंडचिरकर यांनी खरा तो एकतेचा धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत तर रविकांत घोगरे समुहाने आंतरभारती गीत सादर करून कार्यक्रमाची सुरवात केली. यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार तथा आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी, लढणाऱ्यांना बळ देणे हीच आंतरभारतीची भूमिका आहे. दुसऱ्याचे स्वातंत्र अबाधित राखणे म्हणजे स्वातंत्र आहे. असे सांगुन आंतरभारतीच्या माध्यमातून देश तोडण्याचे नव्हे तर देश जोडण्याचे काम केले जाते. या कार्यात जात, धर्म, भेद, पंथ, भाषा असा भेदभाव केला जात नाही, असे सांगितले. आंतर भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. प्राचार्य सदाविजय आर्य यांनी केलेले कार्य अनन्यसाधारण असून त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला व्हावी. या उद्देशाने प्राचार्य
सदाविजय आर्य यांचा स्मृतिग्रंथ आंतरभारतीच्या माध्यमातून काढणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. डी.एस कोरे यांनी प्रास्ताविक केले.
आंतरभारतीचे जिल्हा सचिव शिवलिंग मठपती, उपाध्यक्ष धनराज बिरादार, उपाध्यक्ष डॉ. भास्कर पाटील, संजय पाटील, सहसचिव अरुणाताई चिमेगावे, सुपर्ण जगताप, मनोज शिवनखेडे, कोषाध्यक्ष शिवशंकर मठपती, कांता बुळळा, संगीता मठपती, रत्नमाला मठपती, हणमंतराव बुळळा, मीना पांचाळ, सरोजा अलमले, नागनाथ अलमले, रेखा हल्लाळे, जगदिश नागुरे, महेश झुंगास्वामी, नागनाथ स्वामी, शांतवीर स्वामी, मकरंद बलसुरकर, सुनिता गिरी, विवेकानंद स्वामी, विजय स्वामी, भोसगे, सुषमा अंबुलगे, संजय शिंदे, शिल्पा इंगळे, राम मोतीपवळे, रविंद्र हसरगुंडे, अॅड. महेश मळगे, प्रतिभा मुळे, गोपीनाथ चाटे, साधना घुगे साईनाथ चिमेगोव, कमल पाचंगे, शेख सलाउद्दीन,नागूश स्वामी,वर्षा स्वामी आदींसह पदाधिकारी व कार्यकत्यांनी परिश्रम घेतले. या।स्नेहमेळाव्यास महाराष्ट्र, आंध्रा, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील आंतरभारतीचे सदस्य सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे संचलन आरती जट्टेवार यांनी तर आभार संजय दुनगे यांनी मानले दुसर्या सत्रात विविध कला गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
