लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील पहिली,दुसरी विभागाची शैक्षणिक सहल संपन्न

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील पहिली,दुसरी विभागाची शैक्षणिक सहल संपन्न

उदगीर(एल.पी.उगीले):येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली,दुसरी विभागाची शैक्षणिक सहल कोरोना लॉकडाऊनच्या तब्बल दोन वर्षानंतर उदगीर जवळील देवर्जन येथील हत्तीबेट येथे जाऊन आली.
विद्यार्थ्यांना भौगोलिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी या उद्देशाने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीमध्ये एकूण २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सकाळी ठिक १०वाजता स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य शंकरराव लासूने व मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांच्या हस्ते सहलीच्या गाड्यांची पुष्पहार घालून व श्रीफळ फोडून रवानगी करण्यात आली.
सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी महादेवाचे शिवकारंजे,गुंफा,लेण्या, दत्त मंदिर व महादेव मंदिर इत्यादी स्थळांना भेटी देऊन माहिती घेतली,तसेच हत्ती बेटावरील विविध वनस्पतींची माहिती घेतली.विद्यार्थ्यांनी सहलीचा पुरेपूर आनंद घेतला.
मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख सौ.आशालता कल्लूरकरबाई यांच्या नेतृत्वाखाली इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून सहल यशस्वीरीत्या पार पाडली.

About The Author

error: Content is protected !!