अभाविप उदगीर शहरअध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. किरण गुट्टे व शहरमंत्री म्हणून कु. प्रियंका बिरादार यांची २०२२-२३ साठी निवड

अभाविप उदगीर शहरअध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. किरण गुट्टे व शहरमंत्री म्हणून कु. प्रियंका बिरादार यांची २०२२-२३ साठी निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शहराची २०२२-२३ ची नूतन शहर कार्यकारिणी घोषणा राधाई ब्लड बँकचे संचालक डॉ. विश्वनाथ डांगे व अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा लातूर विभाग संघटनमंत्री ज्ञानेश्वर उद्देवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत लाल बहादूर शास्त्री विद्यालय, उदगीर येथे करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. 2021-22 या वर्षामध्ये झालेले विविध कार्यक्रम, उपक्रम, निदर्शने व आंदोलन विशाल स्वामी यांनी आपल्या मांडले व 2021-22 ची शहर कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली. नविन माणसं आली पाहिजे , आलेली माणसे टिकली पाहिजे, टिकलेली माणसं रुळली पाहिजे, म्हणजे संघटन वाढीस लागते. असे प्रतिपादन ज्ञानेश्वर उद्देवाल यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. या कार्यकारिणी साठी निर्वाचन अधिकारी म्हणून प्रा. अविनाश पाटील यांनी पुनर्निर्वाचित शहर अध्यक्ष प्रा. डॉ. किरण गुट्टे व नवनिर्वाचित शहरमंत्री म्हणून कु. प्रियंका बिरादार, शहर सहमंत्री प्रतिक शिंदे, शहर सहमंत्री दिव्या राठोड, शहर सहमंत्री सुमित लाल, कार्यालय मंत्री श्रेया चिलमिले, सोशल मीडिया संयोजक वैष्णवी बरगाले, संयोजक नितीश शिरसे, सहसंयोजक स्नेहा अंबेसंगे, संयोजक वैभवी लाळे, सहसंयोजक पदमिन बोचरे, कला मंच संयोजक पृथ्वीराज पवार, कला मंच सहसंयोजक तरंगिणी स्वामी, एकलव्य संयोजक मारुती बिरादार, एकलव्य सहसंयोजक मोहिनी कोंगे, संयोजक- संदीप ददापुरे, सहसंयोजक- गौरव घेवंडे, ॲग्रिव्हिजन संयोजक- अनिकेत रहाटकर, ॲग्रिव्हिजन सहसंयोजक- ओमकार पटणे, अभ्यासमंडळ संयोजक-आदिनाथ मिरकल्ले, शहर कार्यकारिणी सदस्य – प्रा. नामदेव एमेकर, प्रा. डॉ. दिपक पानपट्टे, प्रभात सुर्यवंशी, बाळासाहेब बिरादार, ज्ञानेश्र्वर उद्देवाल, रंजित खटके, श्री. शंकर वाघमारे, विशाल स्वामी यांची घोषणा केली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिव्या राठोड यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय रेणुका सोनकांबळे यांनी केले. उपस्थित सर्वांचे सुमित लाल यांनी आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा ही दिल्या.

About The Author