शिवाजी महाविद्यालय उदगीरच्या खेळाडूंचा फुटबॉल स्पर्धेत सहभाग
उदगीर (एल.पी.उगीले) : राणी दुर्गावती विश्वाविद्यालय जबलपूर (मध्य प्रदेश ) येथे संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ फुटबॉल पुरुष स्पर्धेत शिवाजी महाविद्यालयाचे 3 खेळाडु सहभागी झाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघात शेख रहेमत बीए तृतीय वर्ष, शेख शाहेद बीएससी प्रथम वर्ष, शेख अझान बीए प्रथम वर्ष यांचा सहभाग होता.
खेळाडूंना नेहमी प्रोत्साहित करणारे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, कौषाध्यक्ष चामले नामदेव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा. जी. जी. सूर्यवंशी, शिक्षक वृंद, खेळाडू व कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. क्रीडा विभागाचे संचालक प्रा. निहाल अहेमद , प्रा. गजानन माने यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
