उदगीर पंतजलि योग पीठ व भारत स्वाभिमान (स्थापनादिवस )उत्साहात साजरा

उदगीर पंतजलि योग पीठ व भारत स्वाभिमान (स्थापनादिवस )उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : पतंजली योग समिती उदगीरच्या विद्यमाने भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय कौलखेड रोड उदगीर येथे भारत स्वाभिमान, स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी 30 योगसाधक उपस्थित होते. त्याचबरोबर पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान,महिला पतंजली समिती, किसान प्रभारी उदगीर व युवा प्रभारी या पाचही समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला भारत स्वाभिमान उदगीर चे प्रभारी वीरभद्र कप्पिकेरे यांनी योग साधना घेतली. भारत स्वाभिमान स्थापना दिवसाबद्दल उपस्थित साधकांना सविस्तर मार्गदर्शन केले, भारत स्वाभीमान निर्मिती मागची कारणे, त्याची उद्दिष्टे, भारत स्वाभिमानच्या माध्यमातून होत असलेले सामाजिक कार्य, त्याचे चांगले परिणाम यावर चर्चा केली. त्यानंतर स्वदेशी वर त्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर पतंजलि उदगीर चे संरक्षक नरेंद्र यंदे यांनी पतंजली योग समितीच्या माध्यमातून भारतामध्ये होत असणाऱ्या सामाजिक सुधारणेवर प्रकाश टाकला, रामदेवजी बाबा महाराज यांनी व आचार्य बाळकृष्णजी यांनी आयुर्वेद, योग, यज्ञक्रिया, स्वदेशी या माध्यमातून चालवत असलेला सामाजिक सुधारणेच्या महायज्ञ याबद्दल त्यांनी सर्वांना माहिती दिली. या वेळी प्रमुख उपस्थिती पंतजलिचे संरक्षक उमाकांत अंबेसंगे, डां. धनराज एकुंडे,भाग्यलंक्ष्मी मगंल कार्यालय चे अशोक आचार्य,कोषाध्यक्ष शिवकुमार शिरगिरे, महामंत्री श्रीराम चामले, भंडारे , दासरवाड , पत्रकार तगले , नरेंद्र शिंदे, व अनेक साधक व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. तगले यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

About The Author

error: Content is protected !!