दिल्लीत कोराळीच्या माजी सरपंच कल्पनाताई गायकवाड यांना आणखीन एक सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

निलंगा (बालाजी मिलगिरे) : येथील माजी सरपंच सौ, कल्पनाताई गोपाळराव गायकवाड यांना दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात सत्कार करून प्रमाण पत्र व मान चिन्ह देऊन आणखीन एक सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षणाचे जननी, रुढी परंपरा पासून दूर ठेवून शिक्षणाच्या प्रवात आणून महिलांना सक्षम व सशक्त बनवण्यासाठी पर्येंत्न करणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती नवी दिल्ली च्या वतीने
“” सावित्रीच्या लेकी “” असा सर्वोच पुरस्कार संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उलखनीय काम करणाऱ्या महिलांना हा सर्वोच पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव केला जातो.
सन 2021-2022 च्या मानकरी लातूर जिल्यातील कोराळी गावाच्या महिला माजी सरपंच सौ, कल्पनाताई गोपाळराव गायकवाड यांची निवड करण्यात आले होते.
दिल्ली येथे दिनांक 3/1/2023 रोजी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती साजरी करून उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते लातूर जिल्हातील कोराळी गावाच्या माजी सरपंच कल्पनाताई गायकवाड यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरवनित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ, भागवत कराडसाहेब केंद्रीय राज्य मंत्री, लोकशाहीर जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष विक्रम सोळसे सर, विनोद जाधव मिडिया प्रभारी भारतीय जनता पार्टी,मधुकर सोनवणे सहशिक्षक निलंगा, लक्ष्मी जाधव अन्य मान्यवर यावेळी उपस्थितीत होते.
हा सर्वोच्च सन्मान प्राप्त केल्याने जिल्हा भरातून, व गावाकऱ्यांच्या वतीने, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या चहात्याकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.