नांदगाव च्या लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच सौ.माया आनंद पाटील यांनी स्विकारला सरपंच पदाचा पदभार

नांदगाव च्या लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच <a href="http://सौ.माया">सौ.माया</a> आनंद पाटील यांनी स्विकारला सरपंच पदाचा पदभार

तर उपसरपंचपदी शिवाजी उदारे यांची बिनविरोध निवड

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या नांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच होण्याचा बहुमान हा सौ. माया आनंद पाटील यांना मिळालेला आहे. दि 4 जानेवारी रोजी त्यांनी आपल्या सरपंच पदाचा पदभार स्विकारला आहे.

लोकनियुक्त सरपंच सौ. माया आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात वार बुधवार रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यात शिवाजी उदारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये लढत होवुन रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील युवा परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या सरपंचासह ७ सदस्यांना मतदारांनी स्पष्ट बहुमताने विजयी करून एक हाती सत्ता दिली आहे.

नांदगाव च्या लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच <a href="http://सौ.माया">सौ.माया</a> आनंद पाटील यांनी स्विकारला सरपंच पदाचा पदभार

दि. 4 जानेवारी रोजी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी लोकनियुक्त सरपंच सौ. माया आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नूतन ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या निवडीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून झोडगे साहेब यांच्या उपस्थितीत उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदासाठी शिवाजी भिवाजी उदारे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निरीक्षक झोडगे साहेब यांनी शिवाजी उदारे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या निवडीसाठी ग्रामसेवक प्रसाद देशपांडे यांनी सहाय्य केले. या बैठकीस नुतन ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील, आवेश बारब्बा, दत्ता कळबंडे, संजिवनी कळबंडे, अनिता कुलकर्णी, सुनिता वाघमारे, मंदोदरी कुसभागे, महानंदा ढमाले उपस्थित होते.

नांदगाव च्या लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच <a href="http://सौ.माया">सौ.माया</a> आनंद पाटील यांनी स्विकारला सरपंच पदाचा पदभार

या निवडी प्रसंगी माजी उपसरपंच आनंद पाटील, चेअरमन सतिश कुलकर्णी, व्हाईस चेअरमन व्यंकट घोडके, माजी सरपंच महादेव बनसोडे, मारोती चिगुरे, बब्रुवान गव्हाणे, बापुराव साळुंके, बालाजी गव्हाणे, शिवाजी साळुंके, दिलीप पाटील, संतोष साळुंके, अशोक गव्हाणे, महेबुब पठाण, दयानंद कळबंडे, शेख शरीफ, आवद चाऊस, श्रीपाल वाघमारे, विष्णू वाघमारे, गोविंद कोटिवाले, भागवत साळुंके, अशोक महाजन, दत्तात्रय ढमाले, शिवराज वाघमारे, आनंत ढमाले, सिदाजी जगताप, कैलास जगताप, आप्पा सातपुते, सतिश सातपुते, नागु उदारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच, नूतन उपसरपंच, सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!