बोरोळ उपसरपंचपदी प्रमोद पाटील यांची बिनविरोध निवड

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : बोरोळ ता.देवणी येथील उपसरपंचपदी प्रमोद मनोहर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेस सरपंच कृष्णा उर्फ प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंचपदासाठी प्रमोद पाटील यांचा एकच नामनिर्देशन दाखल करण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे दुपारी दोन वाजता घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजकुमार आलापूरे यांनी काम पाहिले. यावेळी तलाठी धनराज भंडारे , ग्रामविकास अधिकारी विनोद खरात ,बीट अंमलदार विनायक कांबळे , पॅनल प्रमुख प्रा. सुनील पाटील, प्रा. नवनाथ खुळे, ग्राम पंचायत सदस्य अनिल बिरादार, सौ. उषा प्रताप कोयले, अयोध्या धनाडे, गोविंद सुर्यवंशी, युवराज देवणे, सौ. सुनिता बिरादार, सौ. संगिता चाफे, पंढरीनाथ खुळे, फुलूबाई गायकवाड, सिताराम पवळे, सनिता बालुरे सह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी गावातील ग्रामस्थ संजय खुळे, प्रताप कोयले, शिवाजीराव देवणे, धोंडिबा मुळखेडे, रामभाऊ देवणे, माधव आप्पाराव बालुरे, दिपक खुळे, परमेश्वर माने, भीम कोयले, ओम पवळे, पंडित मुळखेडे, अनिल तेलगावे, निवृत्ती सुर्यवंशी, संतोष पंढरपुरे, वैजनाथ सपकाळे, दयानंद खुळे, सुनील बिरादार सह अदिंची उपस्थिती होती.