आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते गडदे यांच्या सेल्फ काँक्रीट मशीनचे पूजन

आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते गडदे यांच्या सेल्फ काँक्रीट मशीनचे पूजन

लातूर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पार्टीचे मुरुड अकोला येथील कार्यकर्ते पांडुरंग गडदे यांनी गडदे कंट्रक्शनच्या माध्यमातून नव्याने सुरू केलेल्या काँक्रीट मशीन या व्यवसायाचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते मशीनची पूजा करून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांनी अलँक्स सेल्फ काँक्रीट मशिनरीची सविस्तर माहिती जाणून घेऊन गडदे यांनी सुरू केलेल्या व्यवसायाला चांगले दिवस असल्याचे बोलून दाखविले, आणि शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नाथसिंह देशमुख, प्रदीप पाटील खंडापूरकर, साहेबराव मुळे, भागवत सोट, अरविंद सुरकुटे, चंद्रकांत खटके, काशिनाथ ढगे, ज्ञानेश्वर जुगल, महादेव साळुंके, ईश्वर बुलबुले, रामेश्वर गिराम, राजाभाऊ पांढरे, शरणाप्पा बिडवे, दत्ता शेळके, किरण मुंडे, गोविंद मुंडे, राजेश पांढरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. प्रारंभी पांडुरंग गडदे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करून स्वागत केले.

About The Author

error: Content is protected !!