“शालेय जीवनातीच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षे कडे वळावे” शिक्षणाधिकारी वंदनाताई फुटाणे यांचे प्रतिपादन

"शालेय जीवनातीच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षे कडे वळावे" शिक्षणाधिकारी वंदनाताई फुटाणे यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : आज सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली असल्याकारणाने विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये उचित ध्येय ठरवून स्पर्धा परीक्षे कडे वळावे असे जाहीर आवाहन जि. प. लातूर च्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदनाताई फुटाणे यांनी केले त्या दिनांक 5 जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील वीस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात मार्गदर्शन प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या रेखाताई तरडे-हाके होत्या प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, केंद्रप्रमुख नंदकुमार कोनाले, डॉ.अतुल खडके, मुख्याध्यापक आशा रोडगे सह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना वंदना फुटाणे म्हणाल्या की,जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी, परिश्रम व प्रामाणिकपणे सकारात्मक प्रयत्न करून ध्येय गाठले पाहिजे. या समयी संत ज्ञानेश्वर विद्यालयतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वीस विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केल्याबद्दल व चार विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल, मानाचा फेटा व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.श्रावणी हरिदास भंडे व गार्गी चंद्रशेखर नळेगावकर यांनी २७८ गुण घेऊन अनुक्रमे जिल्ह्यात प्रथम व द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला आहे. गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, डॉ.अतुल खडके यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. अध्यक्षीय समारोप प्राचार्या रेखाताई तरडे-हाके यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन शारदा तिरुके व सतीष साबणे यांनी केले. आभार संगीता आबंदे यांनी मानले. यावेळी माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!