लातूर विभागातील अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांची आढावा बैठक व कार्यशाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट अभियांत्रिकी कॉलेज नांदेड रोड रुद्धा ता. अहमदपूर जि. लातूर येथे लातूर विभागातील अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांची आढावा बैठक व कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाला अध्यक्ष प्राचार्य श्रीमती रेखाताई तरडे मॅडम सचिव श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ मांडुरकी ह्या होत्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून डॉ. गणपतराव मोरे साहेब (विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग) हे होते याशिवाय व्यासपीठावर डॉ. दत्तात्रय मठपती {सहाय्यक शिक्षण संचालक लातूर}, प्राचार्य राजेंद्र गिरी, प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, डॉ. प्राचार्य शिवाजी साखरे, डॉ. योगेश सुरवसे उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी अध्यापक विद्यालयातील डीएलएड प्रशिक्षणार्थ्यांनी यांनी स्वागत गीत सादर केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य रेखाताई तरडे मॅडम यांनी नवीन शैक्षणिक धोरण भावी पिढीसाठी किती महत्त्वाचे आहे यावर सखोल मार्गदर्शन केले. उद्घाटक डॉ. गणपतराव मोरे साहेबांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व सांगताना सहज प्रवेश गुणवत्ता समानता शिक्षण पद्धती व त्यांनी सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी एस आंधळे यांनी केले. याचबरोबर प्राचार्य गटनुळे डॉ. योगेश सुरवसे डॉ. शिवाजी साखरे आदींनी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवशाला शिंदे यांनी तर आभार कोंडीबा माने यांनी मानले.
