ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊ शकतात – आ. बनसोडे

ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊ शकतात - आ. बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊ शकतात हे मरसांगवी येथील मुलींनी दाखवून दिले आहे. कबड्डी सारख्या मैदानी खेळात मुलींनी मिळवलेले घवघवीत यश हे उल्लेखनीय आहे. याचा आदर्श इतरही ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आपण ग्रामीण भागात आहोत म्हणून कोणतेही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने खेळामध्ये सहभागी व्हावे. नवे नवे विक्रम ग्रामीण भागातील खेळाडूंनी घडवावेत असे आपली मनीषा असून ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील मुलीच्या कबड्डी संघाचा सत्कार प्रसंगी बोलत होते. जळकोट तालुक्यातील जि प प्रा शाळा मरसांगवी येथील 14 वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डीच्या संघाने लातूर येथे क्रीडा संकुलन येथे घेण्यात आलेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी गृह तथा आ. संजयभाऊ बनसोडे यांनी मरसांगवी या गावी भेट देऊन कबड्डी स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेल्या आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरलेल्या मुलींचा यथोचित सत्कार आ. बनसोडे यांनी सत्कार केला.

त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धेत सुद्धा विजेतेपद मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. व काही अडचणी आल्यास मला सांगा, मी या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. असा विश्वास देखील याप्रसंगी आ. बनसोडे यांनी दिला. या समयी स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलीचा संघ पुढील प्रमाणे आहे. सुप्रिया माधव कांबळे, अजूम हुसेन जमादार, प्रगती अंगद वाघमारे, आयशा लतीफ शेख, सानिया नबी साब, रुबिना सिकंदर ,चंदा तृप्ती इत्यादी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमथआप्पाजी किडे, ज्येष्ठ पत्रकार मोमीन, युवा नेते विठ्ठलराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव राठोड, आतनूर चे सरपंच चंद्रशेखर पाटील, सरपंच शिरीष चव्हाण, सरपंच रवी गोरखे, उपसरपंच शादूल पटेल, भाऊसाहेब गव्हाणे, नवाज पटेल, आयुब शेख, प्रमोद संगेवार, गणेश गायकवाड, संग्राम घुमारे व समस्त गावकरी तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!