वलांडी – भालकी – हैद्राबाद बस सेवेचा वलांडी बसस्थानकावर जल्लोषात स्वागत
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील वलांडी ते हैद्राबाद कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या भालकी आगाराच्या बसचा शुभारंभ प्रसंगी वलांडी बसस्थानकावर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची भालकी आगाराची वलांडी – भालकी – हैद्राबाद ही बस वलांडी बसस्थानकावरुन दररोज सकाळी सहा वाजता हैद्राबाद साठी निघणार असून आळवाई- मेहकर-भालकी-बिदर-जहीराबाद या मार्गे हैद्राबाद येथे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पोहचणार आहे.हैद्राबाद येथील महात्मा गांधी बसस्थानकातून दुपारी साडे बारा वाजता वलांडी कडे निघणार आहे.
यावेळी वलांडी – हैद्राबाद बसला वलांडी बसस्थानकावर फुलांच्या माळांनी सजविण्यात येवून ढोलताशांच्या गजरात बसचे जल्लोषात वलांडी बसस्थानकावर स्वागत करण्यात आले.तसेच बस चालक संजयकुमार गायकवाड व बस वाहक अनिलकुमार बिरादार आणि पब्लिक स्कुलचे अध्यक्ष प्रविण हणमंत शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच राम भंडारे, बालाजी सोनकवडे, हाकीम बौडीवाले, सुनील चिल्लरगे, मुस्ताक खादरी, आसलम ताबोळी, हसन बौडीवाले, ज्ञानोबा भंडारे, साबेर पठाण, महेश भंडारे, रवी गायकवाड, नबीसाब सय्यद, सगीर मोमीन, खंडु तात्या, दयानंद सूर्यवंशी, अझहर शेख, यांच्यासह प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वलांडी -भालकी- हैदराबाद ही बस चालू केल्याबद्दल भालकी आगाराचे व्यवस्थापक नवीन शेख व भालकीचे आमदार ईश्वर खंडरे यांचे वलांडीसह या भागातील प्रवाशांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
