मनसेच्या ता. सचिवपदी सुनिल तोंडचिरकर यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्षांमध्ये अनेक संघटनात्मक बदल केले जात असून पक्ष वाढी संदर्भात काम करणाऱ्या तरुणांना संधी दिली जात आहे. याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यात ही तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी नुकतेच उदगीर मधील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा अहवाल पक्षश्रेष्ठी समोर सादर केला गेला. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तरुणांना पदे देऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहेत. सुनिल तोंडचिरकर यांचे सामाजिक कार्यतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संतोषभाऊ नागरगोजे प्रदेश सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते सुनिल तोंडचिरकर यांची उदगीर तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. आणि भविष्यात त्यांच्या हातून पक्षवाढी संदर्भात भरीव कामगिरी व्हावी, तसेच गोरगरीब सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्या संदर्भात ते सदैव तत्पर असावेत, तसेच त्यांच्या हातुन उदगीर तालुक्यात पक्ष संघटन मजबुत व्हावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
या नियुक्तीच्या वेळी तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे,शहराध्यक्ष संतोष भोपळे, रामदास पाटील जिल्हाउपाध्यक्ष शेतकरी सेना,तालुका उपाध्यक्ष दयानंद डोंगरे ,शहर उपाध्यक्ष लखन पुरी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
