संपूर्ण मोफत मुक्ताई वृद्धाश्रम, उदघाट्न सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार
उस्मानाबाद (एल.पी.उगीले) : वेध फौंडेशन संचालित संपूर्ण मोफत आशा मुक्ताई वृद्धाश्रमाचे उदघाट्न सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी नवनिर्वाचित सरपंच सुनिल बप्पा जाधवर, उपसरपंच रविकार बप्पा मोराळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते होणार आहे. कांतीलाल बोराणा (जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ), प्राचार्य सुधाकर जाधवर, तय्यब चाचा दारुवाले, प्रदिप शिंदे (मॅनेजर, प्रियदर्शनी कॉ. बँक, कळंब ), रमेश जाधवर (उद्योजक ), नाईकवाडे (पोलिस उपनिरीक्षक, येरमाळा ), राजेंद्र शैकडे , राजेंद्र डोईफोडे ,रेखाताई सोनावणे, मनिषा दराडे, ज्योती लटपटे, सुनिता सांगळे,भारती आव्हाड,वैशाली चाटे पुणे या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

नवनाथ बाग हा कृषि, पर्यटन, सामाजिक व अध्यात्मिक असा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. याचाच एक भाग ज्या वृध्द लोकांना मुलगा अथवा मुलगी नाही अशा वृध्द लोकांसाठी संपूर्ण मोफत असा हा वृद्धाश्रम असणार आहे. या वृद्ध क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, भगवान बाबा, वामनभाऊ, लोकनेते गोपीनाथ मुंढे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, कै. नवनाथ (गुरुजी )मोराळे यांचे भव्य पुतळे नवनाथ बागेत उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे.
ज्या वृध्द लोकांना मुलगा अथवा मुलगी नाही आशा वृध्द व अनाथ लोकांना मुक्ताई वृद्धाश्रम मध्ये पोहच करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्ता व संपर्क :मुक्ताई वृद्धाश्रम,नवनाथ बाग, नांदगाव (वडजी ), तुळजापूर शिर्डी मार्ग, ता. वाशी, जि. उस्मानाबाद. (8485883863whup )
