पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्यामलाल हायस्कूलचे घवघवीत यश

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2021–22 मध्ये शासनातर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्यामलाल हायस्कूलचे घवघवीत यश

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये श्यामलाल हायस्कूलचे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत, त्यामध्ये विश्वनाथे आकांक्षा महादेव, सोनटक्के बाजीराव संजय, बिरादार वेदांत सुदेश, ढगे रागिनी प्रदीप या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य , संस्था उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, संस्था सचिव ऍड. विक्रमजी संकाये, संस्था सहसचिव श्रीमती अंजुमनीताई आर्य तसेच श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये यांनी अभिनंदन केले, व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील उज्वल शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांना श्यामलाल हायस्कूल मधील शिक्षक बारोळे गोविंद, शेख सईद, सूर्यवंशी उमाकांत, रणमले सरशा यांनी मार्गदर्शन केले.

About The Author

error: Content is protected !!