उदगीर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने दर्पण दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीर संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुका पत्रकार संघ यांच्या पुढाकाराने दर्पण दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन उदगीर येथील ज्येष्ठ नागरिक रंगा राचुरे व पत्रकार विश्वनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिवराज तोंडचिरकर,उदगीर शहर पोलिस निरीक्षक गोरख दिवे,बाजार समितीचे माजी सभापती सिध्देश्वर पाटिल,ब्लड बॅंकेचे अध्यक्ष रमेश अण्णा अंबरखाने,रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे,मलकापूरचे सरपंच गूरुनाथ बिरादार,अॅड दत्ता पाटिल,बाबुराव पांढरे,विजय पारसेवार,नंदकुमार पटणे,उमाकांत याला आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबीर मध्ये रोहित मोतीपवळे,निखिल परडे,अमित भोसले,दयानंद बिरादार,संगीता बिराजदार,पुनम सूर्यवंशी,श्रद्धा आतनुरे,करण भदाडे,अमोल बाहेती,भीमराव गायकवाड,मदन शेळके,चंद्रकांत भांजे,प्रशांत कस्तुरे,गिरीश अनारगट्टे,सचिन बिरादार,बाबासाहेब सूर्यवंशी,अतुल बिरादार साईनाथ चिमेगावेे, मुकेश नेरूणे,विश्वनाथ गायकवाड यांनी रक्तदान करून पत्रकार दिन साजरा केला.यावेळी सचिन शिवशेट्टे,श्रीनिवास सोनी,विक्रम हलकिकर,महेश मठपती, माधव घोणे, राम जाधव, फय्याज डांगे, बस्वेश्वर डावळे आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर आयोजकांचे व रक्तदान करणाऱ्या युवक युवतींचे कौतुक व आभार नागपा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीर चे अध्यक्ष रमेश अंबरखाने यांनी मानले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे,सचिव दयानंद बिरादार, डाॅ. धनाजी कुमठेकर ,राजकुमार मोगले,रविंद्र हसरगुंडे,श्रीपाद सिमंतकर,सुनिल मादळे ,माधव रोडगे,नागेंद्र साबणे,मनोहर लोहारे,मुकेश नेरुणे,प्रविण जाहूरे,अमोल कांबळे आदीनी परिश्रम घेतले व रक्त संकलन करण्यासाठी बँकेचे बी टी ओ डॉ शेटकार बस्वराज,पी आर ओ ओम गांजुरे,अविनाश बिरादार,सचिन कोनाळे,सपना कांबळे,विनायक टकटवळे,अविनाश जयकर उपस्थित होते.
