अतनुरात जिजामाता जयंती साजरी

अतनुरात जिजामाता जयंती साजरी

अतनूर (एल.पी.उगीले) : येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला मुक्तेश्वर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस विकास सोमुसे, शिवसेना तालुका संघटक मुक्तेश्वर पाटील, उपसरपंच बाबुराव कापसे, ग्रामसेवक एफ.एफ.शेख, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष बी.जी.शिंदे, कामगार काँग्रेसचे कैलास सोमुसे-पाटील, बालाजी येवरे, ज्ञानेश्वर जाधव, नितीन सोमुसे, शिवसेना विभाग संघटक गोविंद बारसुळे, सूर्यकांत येवरे, आयुबसाब मुंजेवर, आदित्य बोडेवार, संग्राम घुमाडे, माजी सरपंच ज्ञानोबा वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड, माधव सोमुसे, सुदाम बाबर, चंदर गायकवाड, गुंडू बोडेवार, राम गायकवाड व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य शाखेत जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे यांच्या हस्ते जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वसुंधरा महिला मंंडळ, जिजामाता महिला मंंडळ, साधूराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर येथेही जिजाऊ मातेस अभिवादन करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!