लोणीमोडच्या जि.प.प्रा.शाळेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ माॅ साहेब जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वामी विवेकानंद जयंती राजमाता जिजाऊ माॅ साहेब याची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.प्रा.शाळा लोणीमोडचे मुख्याध्यापक संजय रामदास वाघमारे, प्रमुख पाहुणे म्हनुण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शादुल शेख तसेच अलताफ शेख, साहिल पठान उपस्थित होते. यावेळी कितीॅ काळे, स्नेहा सुरनर, अन्सारी सिमरण, गणेश सुर्वणकार, राजनंदीनी वाघमारे, अजहर शेख,सोयफ शेख,रज्जाक शेख,नूरअली शेख, राहील शेख,आलिया शेख,सोनाक्षी सुरनर,आदिल शेख, त्रीशा पिटलेवाड, मुस्कान शेख,श्रेया सुर्यवंशी,रोशनी कानूरे,सर्मथ सुरनर,अरखम शेख,प्रसाद खपरले आदि विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्याना सुगंधी भाग्यलक्ष्मी यांनी मार्गदशन केले. शाळेतील संजय वाघमारे, सुगंधी भाग्यलक्ष्मी, निर्मला वाघमारे, शादुल शेख, अलताफ शेख,साहिल पठान, पालक व विद्याथीॅ उपस्थित होते.
