ग्रंथालय शाळेच्या दारी
हेर (एल.पी.उगीले) : ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय हेर ता. उदगीर च्या वतीने ग्रंथालय शाळेच्या दारी या उपक्रमांअंतर्गत निर्मलपुरी विद्यालय हेर या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनालयाचे सभासद होण्यासाठी माहिती देण्यात आली.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत घोगरे, ज्ञानदीप वाचनालयाचे सचिव डॉ.मंगेशकुमार हेरकर, निर्मलपुरी विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश , शाळेचे ग्रंथपाल वैजनाथ गिरी व सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे सचिव डॉ.हेरकर यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना जेणेकरून अभ्यासाची गोडी लागावी. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे डॉ.हेरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
