शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्रचार्य डॉ. आर एम मांजरे, प्रबंधक बी के पाटील ,गुरुनाळे व्ही डी, लाडके आर व महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन जयंती प्रमुख प्रो.डॉ.सुरेश शिंदे यांनी तर आभार डॉ सी जे देशमुख यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
