राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती श्यामलाल हायस्कूल मध्ये उत्साहात साजरी

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती श्यामलाल हायस्कूल मध्ये उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरीयल हायस्कूल मध्ये राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस प्रभारी पर्यवेक्षक राहूल लिमये व इंग्रजी विभाग प्रमुख संजय देबडवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

दिवणे श्रुती, गोंडगावे सिंधु, कन्नाडे श्रद्धा, बिरादार साईविश्व या विद्यार्थ्यांनी प्रभावीरीत्या दोन्ही महान व्यक्तिमत्वाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक उमाकांत सूर्यवंशी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मनोगत प्रभावीरित्या व्यक्त केले. आई हिच जगातील सर्वात मोठा गुरु व योद्धा असते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या. त्यांच्या संस्कारामुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यासारखे महान राजे घडले, यासंबंधी मनोगत व्यक्त केले.त्याचबरोबर स्वामी विवेकानंद हे तरुणांचे आदर्श आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा यासंबंधी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपामध्ये मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्व आपल्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्या कार्याचा, संस्काराचा आदर्श समोर ठेवून आपण सर्व कार्य करुया, यासंबंधी मनोगत व्यक्त केले.

बिरादार राजविर या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान करून सर्वांना आकर्षित केले, त्याचबरोबर देवणे श्रुती, गोंडगावे सिंधू , आवाळे वैष्णवी या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली.श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्व हे भारतीयांसाठी आदर्श आहेत, त्यांचे कार्य आपणांसाठी प्रेरणादायी आहे. असा संदेश दिला.राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव हाके यांनी केले तर आभार कावरे प्रमोद यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!