दावणगाव येथे ग्राम विकासाचे विविध उपक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : मानवता विकास प्रतिष्ठानच्या वतीने गावातील दहावी,बारावी मधील प्रथम,द्वितीय आलेले गुणवंत विद्यार्थी दहावीतील पृथ्वीराज शिवाजीराव मुळे, अंकिता अरविंद जबाडे व बारावीत तुषार धनाजीराव मुळे, प्रतिक मदन भंडे यांचा तसेच नविन नौकरीस लागलेल्या तरुणांचा, नव उद्योगधंदे उभा केलेल्या तरुणांचा जाहीर सत्कार करण्यात आला. गावातील आदर्श पालक देविदास कांबळे यांना पाच लेकर असून पाचच्या पाच लेकर डाॅक्टर केले आहेत.तसेच 9वी, 10 वीतील बारा गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या पुढाकारातून संपुर्ण दावणगाव नगरीची ग्राम स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील गटारे, रस्ते स्वच्छ करण्यात आले. तसेच संपूर्ण गावात जंतूनाशकाची फवारणी करण्यात आली.दि. 10 जानेवारी रोजी सकाळी मोफत सर्व रोग निदान शिबीर घेऊन त्यात जवळपास 200 पेशंन्टची तपासणी करून त्यांना मोफत औषधे प्रसाद प्रभू भद्रशेट्टे यांच्या वतीने देण्यात आले. संध्याकाळी 7 ते 10 या वेळात सप्त खंजिरी वादक ” सत्यपाल महाराज” यांचा जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सत्यपाल महाराज यांनी शिक्षण, ग्राम स्वच्छता, अंधश्रद्धा, दारुबंदी, व्यसनमुक्ती, सामुहिक विवाह सोहळे , शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नावर मनोरंजक पद्धतीने प्रबोधन केले. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेकापुर, कुमदाळ, करखेली, अरसनाळ, कोनाळी, येणकी इत्यादी गावातील लोक उपस्थित होते.सदर कार्यक्रमास गावातील सर्व गटतट एकत्र करण्याचे काम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अॅड. भद्रशेट्टे निळकंठ (मुंबई हायकोर्ट) सल्लागार डॉ. सतीश भंडे, पुणे,प्रकाश साखरे, उद्योजक,प्रा. जनार्दन जाधव, इचलकरंजी, उमाजी भाऊ मुळे,हुसेन साहब वाडीवाले,प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशनराव बिरादार, सचिव रफीक बागवान, कोषाध्यक्ष पांडूरंग फुले, उपाध्यक्ष अनिल सनगल्ले, वाघंबर कांबळे, सहसचिव दिलीप भंडे, रमेश जाधव, सदस्य बाबूस भंडे, संतोष पताळे, पुंडलीक भोळे, राजू भंडे, प्रभुदास मोहीते, सचिन भंडे, माधव भंडे, संग्राम पताळे, पद्माकर फुले, चंद्रकांत कांबळे, चक्रधर भंडे, सचिन भद्रशेट्टे, जाफर वाडीवाले, सतीश हुरुसनाळे, प्रविन भंडे, आनंद पताळे, इत्यादीने परिश्रम घेतले.
