ढोरसांगवी शाळेत राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
उदगीर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरसांगवी येते जगातील आदर्श मातृत्वाचा अखंड ऊर्जा स्त्रोत,स्वराज्य प्रेरिका,राष्ट्रमाता, राजमाता , जिजामाता यांची जयंती व ज्यांनी हिंदू धर्म,हिंदू धर्माचे तत्वज्ञान आणि हिंदू संस्कृती संपूर्ण जगाला पटवून देणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अनेक मुलींनी हातात तलवारी घेऊन राजमाता जिजाबाई यांची वेशभुषा परिधान केली होती. तसेच मुला,मुलींनी जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित छोटी -छोटी भाषणे केली, तसेच गीते ही सादर केली.या कार्यक्रमाला वांजरवाडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय नारायण तिगोटे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ही केले. जी.टी.मुंडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर ज्ञानोबा टेकले यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश गुरमे, दत्ता पवार व श्रीमती नलाबले मॅडम आदी उपस्थित होते.
